महाराष्ट्रमुख्य बातमी

कलगी तुरा लोककला संवर्धनार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींना कलगी तुरा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

मुंबई : कलगी तुरा लोककलेच्या संवर्धनार्थ भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ, युवा शाहिरी लोककलावंतांना गेली ६५ वर्ष गौरवशाली परंपरा लाभलेली कलगी तुरा समाज उन्नती मंडळ -मुंबई (महाराष्ट्र) या मातृसंस्थेच्या वतीने “कलगी तुरा शाहीर पुरस्कार २०२५-२६” ने गौरविण्यात येणार आहे. त्याच बरोबर सामाजिक, पत्रकारिता, कला, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींनाही पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर कलगी तुरा लोककलेने कोकण प्रांताला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली असून कलगी तुरा लोककलेचे जतन -संवर्धनासाठी कोकणातील अनेक ज्येष्ठ शाहीर लोककलावंतांनी आपले आयुष्य लोककलेसाठी खर्ची घातले आहेत. पिढ्यानपिढ्या जोपासलेली आणि आध्यत्मिकतेची जोड असणारी ही लोककला गुरुपरंपरा कायम ठेवत पुढील पिढीकडे प्रवाहित होते ही भूषणावह बाब आहे.

या पुरस्कारासाठी निवड केलेले शाहिरी लोककलावंत तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती अशा : “कलगी तुरा शाहीर पुरस्कार-२०२५-२६” – संजय रत्नाकर गोणबरे- (मुंबई), आनंद भिकाजी कुळये (कोंडये तर्फ सोंदळ, राजापूर, जि. रत्नागिरी), हिरु रामचंद्र भोस्तेकर (हार्डी, रोहा, जि. रायगड, योगेश महादेव कातकर-कासे (पिंपळवाडी- संगमेश्वर, जि. रत्नागिरी, प्रकाश सुलोचना रामजी पाजणे (मालुक, तळा जि. रायगड), अनंत सुरेश बावकर (खडकवली कोतापूर- राजापूर, जि. रत्नागिरी, शरद गणपत कदम (कासे – गुरववाडी, संगमेश्वर, जि. रत्नागिरी, शाहिद आदम खेरटकर (पोसरे (बु.) तांबडवाडी, खेड जि. रत्नागिरी), विकास सखाराम लांबोरे (मु.विवली ,पो. केळंबे, लांजा जि. रत्नागिरी), अंकुश रामचंद्र गुरव (कोचरी व्हाया शिपोशी, लांजा जि. रत्नागिरी), जयंत राजाराम चव्हाण (मु. निवेखुर्द पो. हातीव, संगमेश्वर जि. रत्नागिरी), शांताराम विठ्ठल मालप (निवळी, जि. रत्नागिरी).

कलगी तुरा उपासक पुरस्कार २०२५-२६ : प्रभाकर हरिश्चंद्र धनावडे (वाटद- खंडाळा (कवठेवाडी) जि. रत्नागिरी).

कलगी तुरा आदर्श संपादक पुरस्कार २०२५-२६ : विनोद कैलास गोरे- (मुख्य संपादक) दैनिक अक्षराज मीडिया, (चहोली खु., आळंदी) पुणे, मुझम्मील मुश्ताक काझी- (संपादक) ग्रामीण वार्ता, उक्षी-रत्नागिरी,

कलगी तुरा आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५-२६ : रघुनाथ भागवत- दै.पुढारी (चिंभावे) महाड-रायगड,

कलगी तुरा आदर्श आयोजक पुरस्कार-२०२५-२६ : जय गणेश मित्र मंडळ दिलीप नामे आणि सहकारी (मुंबई),

कलगी तुरा स्वरध्वनी गौरव पुरस्कार २०२५-२६ : अनंत धोंडू बाईत- अरविंद रेकॉर्डिग स्टुडिओ (खिंडीपाडा) भांडुप-मुंबई.

कलगी तुरा समाज उन्नती मंडळ -मुंबई संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या “गौरी गणेश जाखडी नृत्य स्पर्धा-२०२५-२६ व कलगी तुरा दिनदर्शिका -२०२६ प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा ७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह, दहिसर चेक नाक्याजवळ, महाजन वाडी मिरारोड, पूर्व मुंबई उपनगर येथे होणार आहे. यावेळी युवक महाराष्ट्र प्रदेश (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) उपाध्यक्ष सुशांत जाबरे, खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, रत्नागिरी तालुका कुणबी विकास सह.पतसंस्थेचे संचालक प्रथमेश गावणकर, समाज सेवक दिनेश कुरतडकर, उद्योजक प्रमिल पत्याने, कैलास (दादा) धाडवे, रवींद्र मटकर, अभय सहस्त्रबुद्धे, नारायण चाफडे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस संतोष धारशे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!