गुरव ज्ञाती समाज संस्थेतर्फे वधू वर सूचक मेळावा उत्साहात

रत्नागिरी : गुरव ज्ञाती समाज मुंबई ऐ १६१४ संस्थेच्या वतीने आयोजित केलेला वधू वर सूचक मेळावा नुकताच नालासोपारा (पूर्व) येथील कांचन हायस्कूल येथे मुले-मुली आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रारंभी संस्थेचे प्रमुख कार्यवाह गणपत लाड, विश्वस्त सौ. सुजाता पवार, सह सचिव विलास गुरव (डोंगरकर) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुधीर मुंडेकर यांनी केले. प्रास्ताविक खजिनदार सुभाष चव्हाण यांनी केले. अनंत गुरव यांनी वधू वर यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र गुरव यांनी समाजातील विवाह जुळविताना पालकांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन केले. तर आभार प्रदर्शन संस्थेचे प्रमुख कार्यवाह गणपत लाड यांनी केले. विवाह कमिटी सुभाष चव्हाण, रघुनाथ गुरव, महेश गुरव, मोहित चव्हाण, गोविंद गुरव आणि कार्यकर्ते विलास गुरव, अनिल गुरव, विजय गुरव, राजेश शंकपाळ आणि सर्व प्रमुख महिलांचे आणि ज्यांनी कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

