मुख्य बातमी
सोमवारी रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार

रत्नागिरी : नगरपालिका पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी (१५ डिसेंबर) संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती रत्नागिरी नगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून पालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


