रत्नागिरीत ‘दैवज्ञ चषक’ जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : चौथी दैवज्ञ हितवर्धक समाज, रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने या वर्षातील पाचवी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ दैवज्ञ हॉल, नाचणे रोड, रत्नागिरी येथे १० ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत दैवज्ञ चषक या नावाने आयोजित केली आहे. ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट अशा सात गटांत खेळवली जाणार आहे. या वर्षी नवीनच खेळणाऱ्या खेळाडूंनी २०२५-२६ या वर्षाची ५० रुपये नोंदणी शुल्क जिल्हा असोसिएशनकडे जमा करायचे आहे.
स्पर्धेसाठी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये, तर लहान गटासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे, अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल.
सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. स्पर्धेत सामना खेळणासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय पंच मंदार दळवी व राज्यस्तरीय पंच सागर कुलकर्णी तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून सचिन बंदरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन दैवज्ञ हितवर्धक समाज अध्यक्ष संतोष भुर्के, उपाध्यक्ष सुहास वीरकर, सरचिटणीस धनेश रायकर, सह सरचिटणीस राजेंद्र भुर्के, खजिनदार गुरुप्रसाद खेडेकर, सह खजिनदार ऋषिकेश वीरकर, कार्याध्यक्ष संतोष खेडेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये यांनी केले आहे.
तालुका प्रतिनिधी असे : गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख – राहुल भस्मे (९६५७६३७६७८), मोहन हजारे (९४२२०५३९४३), चिपळूण – प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा – मनोज जाधव (७६२०११६७३६), खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर – मनोज सप्रे (९४०३७६८३७६), दापोली – माधव शेट्ये (९२०९७०९७९२)



