आरोग्यमुख्य बातमी

रत्नागिरीत १० मे रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर

शिबिराचा लाभ घेण्याचे नीलेश आखाडे यांनी केले आवाहन

रत्नागिरी : इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, भाजपा आयटी जिल्हा संयोजक निलेश आखाडे, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे, गुरुप्रसाद फाटक यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल साळवी स्टॉप रत्नागिरी उद्या (१० मे) मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला सहभागी होता येणार आहे.

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र. ५, ६, ७ या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नीलेश आखाडे यांच्या वतीने मोफत वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी देखील या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आखाडे यांनी केले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे, अशांनी ९८६०६२५७४०, ७३८५५३०५२१, (79720 61996 what’s up) या क्रमांकावर संपर्क करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्रद्धा कळंबटे, गुरुप्रसाद फाटक, नीलेश आखाडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!