अनधिकृत एलईडी मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून कारवाई

रायगड : महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील २ मासेमारी नौकांवर १७ व १८ डिसेंबर रोजी रात्री २.१० वाजता मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेद्वारे कारवाई करण्यात आली.
जगन्नाथ माया कोळी (रा. राममंदिर केळवणे, ता. पनवेल) यांच्या मालकीच्या साई गणेश (क्र. IND-MH-7-MM-1318) ही नौका १७ डिसेंबर रोजी खदेरीच्या समोरील समुद्रात रात्री ९.३० वाजता १० वावात अनधिकृत एलइडी पद्धतीने मासेमारी करत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली. १७ रोजी रोजी रात्री ११ वाजता अलिबाग समोरील समुद्रात १२ वावात मासेमारी करत असताना यशवंत गणपत नाखवा (रा. साखरकोळीवाडा पो. आक्षी ता. अलिबाग) यांच्या मालकीची हेरंब कृपा (क्र. IND-MH-3-MM-4194) ही नौका अनिधकृत एलएईडी पद्धतीने मासेमारी करीत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली.
१८ डिसेंबर रोजी सकाळी ६वाजता प्रकाश तुकाराम पाटील (रा. करंजा ता. उरण) यांची मासेमारीनौका श्रीसमर्थ कृपा (क्रं. IND-MH-7-MM-3627) या नौकेची विभागाच्या गस्तीनौकेवरून तपासणी केली असता या नौकेत ४००० वॅटचे अंडर वॉटर एलएईडी लाईटचे चार नग, ३००० वॅटचे अंडर वॉटर एलएईडीचे लाईटचे तीन नग, २५०० वॅटचे अंडर वॉटर एलएईडी लाईटचे एक नग, सीया लाईट १०० वॅटचे १६ नग, चारशे वॅटचे २ नग हॅलोजन बल्ब, एक जनरेटर असे अनिधकृत एलएईडी मासेमारी करण्याचे साहित्य पकडण्यात आले आहे.
या तीनही अनधिकृतपणे एलएईडी मासेमारीनौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दहाड सत्रात पकडण्यात आल्या असून या मासेमारी नौका व त्यावरील साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई सहआयुक्त (सागरी) महेश देवरे , प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई नागनाथ भादुले, परवाना अधिकारी ससून गोदी, परवाना अधिकारी करंजा, परवाना अधिकारी मिरकरवाडा रत्नागिरी व परवाना अधिकारी साखरीनाटे रत्नागिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.


