हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपसभापती नीलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिओ डोस

आबलोली (संदेश कदम) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी येथे गुहागर तालुका पंचायत समितीचे उपसभापती निलेश विश्वनाथ सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थी बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले.
प्रतिवर्षी शासनाच्या वतीने पोलिओ डोस दिले जातात. याचाच भाग म्हणून २८ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हे, तालुक्यांच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने या पोलिओ डोसचे आयोजन करण्यात येते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य विभागामार्फत या पोलिओ डोसचे योग्य असे नियोजन गुहागर तालुक्यात करण्याचा आले होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवीचे सहाय्यक डॉ.कौशल्य वेल्हाळ, परिचारिका श्रीमती शेलार, आशा सेविका सौ. रवीना मोहित, लाभार्थी बालक, माता पालक उपस्थित होते.
या उपक्रमासाठी उपसभापती नीलेश विश्वनाथ सुर्वे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.



