मुख्य बातमी
क्रांतीनगर येथे सापडले एक दिवसाचे अर्भक; परिसरात खळबळ

रत्नागिरी : शहरापासून जवळच असलेल्या क्रांतीनगर झोपडपट्टी जवळील डम्पिंग ग्राउंड येथे आज (१० जानेवारी) सायंकाळच्या सुमारास एक दिवसाचे अर्भक सापडल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
परिसरातील काही जागरूक नागरिकांनी या घटनेची माहिती जितेंद्र उर्फ दादा कदम यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दादा कदम यांच्यासह आनंद कट्टीमणी, परशुराम धोत्रे, सागर चव्हाण यांनी तातडीने या अर्भकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून सध्या हे अर्भक अति दक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून, पुढील कार्यवाही शहर पोलीस करत आहेत.


