मुख्य बातमी

३१ डिसेंबर आणि पर्यटन हंगामात सतर्क राहून कारवाई करा : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

नार्को को-ओर्डीनेशन जिल्हास्तरीय समितीची बैठक

रत्नागिरी : ३१ डिसेंबर तसेच सध्याचा पर्यटनाचा हंगाम पाहता सर्वच यत्रंनेने सतर्क राहून अंमली पदार्थांच्या विरोधात भरीव कारवाया कराव्यात, अशी सूचना निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.

श्री. महामुनी यांनी सविस्तर आढावा‍ दिला. जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी विभागनिहाय तसेच उपविभागानुसार सविस्तर आढावा घेतला. कोस्टगार्डने बोटींची तपासणी करण्याच्या तसेच सध्याच्या पर्यटन हंगामाबाबत‍ पोलिसांसह सर्व यंत्रणांनी सतर्क राहून भरीव कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पोलिसांनी गस्त वाढवून आपले गोपनीय नेटवर्क वाढवावे आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणारी तडीपारीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत, असे त्यांनी सांगितले. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याचे, शिक्षकांनाही सतर्क करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

कृषी आणि वन विभागाने गांजाची लागवड होणार नाही यासाठी सतर्क राहावे असे सांगतानाच गांजा सेवन प्रकरणात, तो कुठून आणला जातो याबाबत मुळाशी जाऊन तपास करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!