कुणबी समाजोन्नती संघाच्या रत्नागिरी ग्रामीण शाखेतर्फे १७ रोजी विविध कार्यक्रम
लोकनेते शामराव पेजे यांच्या जयंतीचे औचित्य

रत्नागिरी : कुणबी समाजोन्नती संघाच्या (मुंबई) रत्नागिरी ग्रामीण शाखेतर्फे लोकनेते शामराव पेजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (१७ जानेवारी) विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये शनिवारी सकाळी १०.३० वाजता लोकनेते शामराव पेजे यांच्या स्मारकाला पुष्पहार अपर्ण करणे, सकाळी ११ वाजता कुणबी समाजोन्नती संघाच्या रत्नागिरी ग्रामीण शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन, कुणबी भवन, रम्य नगर, जे. के. फाईल्स जवळ, रत्नागिरी येथे होणार आहे. त्यानंतर येथे सकाळी ११.३० वाजता लोकनेते शामरावजी पेजे स्मृती न्यास आणि कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरी यांचा संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती वाटप आणि मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम होणार आहेत.
तसेच दुपारी १२ वाजता कुणबी समाजोन्नती संघ संचलित कै. रामा देवजी ढेपसे मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थीनींची रांगोळी स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ४ वाजता कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरी तालुका महिला मंडळ आयोजित हळदी-कुंकू समारंभ, ४.३० वाजता ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी कार्यक्रम कुणबी समाजोन्नती संघ आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित केला आहे. सायंकाळी ६.३० वाजता मुलींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांसाठी समाज बंधू व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष रामभाऊ गराटे, युवा अध्यक्ष ॲड. सागर कळंबटे, महिला अध्यक्षा विनया गावडे यांनी केले आहे.



