मुख्य बातमी

प्रलंबित मोजणी प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी उप अधीक्षक स्वतः शेतात

रत्नागिरी : प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उप अधीक्षक नरेंद्र गोरे हे मोजणीसाठी स्वतः शेतात उतरले आहेत. जानेवारीअखेर कोणतेही प्रकरण मुदतबाह्य राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागातील ३ महिन्यांवर प्रलंबित असलेल्या मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी मोजणी करण्याची विशेष मोहीम जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. त्या अनुषंगाने उप अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी कार्यालयात एकूण १३५ मोजणी प्रकरणे जानेवारीअखेर मुदतबाह्य होणार आहेत. त्यापैकी ९० प्रकरणांची मोजणी पूर्ण होऊन ही मोजणी प्रकरणे कार्यालयीन कामावर प्रलंबित आहेत. उर्वरित मोजणी प्रकरणांपैकी ४५ मोजणी प्रकरणांचा जानेवारीमध्ये मोजणीसाठी दौरा लावण्यात आला आहे.

शिल्लक राहणारी १९ मोजणी प्रकरणे १७ जानेवारी या सुट्टीच्या दिवशी मोजली जाणार आहेत. त्यासाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी होणार असून जानेवारीअखेर कोणतेही प्रकरण मुदतबाह्य राहणार नाही, असा विश्वास उप अधीक्षक नरेंद्र गोरे यांनी व्यक्त केला असून, या विशेष मोहिमेस पक्षकारांचे सहकार्य मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!