मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
कापसाळ गणातून ‘आरपीआय’चे उमेदवार विनोद हिरे यांना विजयी करा
तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते यांचे आवाहन

आबलोली (संदेश कदम) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उमेदवार आणि मिरजोळी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील विश्वासू सहकारी दिवंगत गंगाधर हिरे यांचे चिरंजीव विनोद हिरे हे महायुतीच्या माध्यमातून कापसाळ पंचायत समिती गणामध्ये निवडणूक रिंगणात उमेदवारी लढवत आहेत.
सर्व रिपब्लिकन पक्षाच्या गटातटांनी एकत्र येऊन आपला हक्काचा उमेदवार म्हणून विनोद हिरे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते यांनी केले आहे.



