मुख्य बातमी

चिपळुणात एसटी बस–कार भीषण अपघात

चिपळूण : शहरातील बुरुमतळी परिसरात सोमवारी (२ फेब्रुवारी) दुपारी सुमारे ३ वाजता एसटी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याची घटना घडली नाही; मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारच्या दर्शनी भागाचे गंभीर नुकसान झाले आहे.

चिपळूण बस स्थानकातून सुटलेली हडकणी–चिपळूण एसटी बस पाग नाका परिसरात आली असता समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार काही अंतर फरफटत गेली. या अपघातात कारचालक थोडक्यात बचावला.

अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!