क्रीडामहाराष्ट्रमुख्य बातमी

खो-खो परिवारातर्फे पुणे येथे अजित पवार यांच्या शोकसभेचे आयोजन 

मुंबई : महाराष्ट्राचे क्रीडा नेतृत्व, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी खो-खो परिवारातर्फे रविवारी (८ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता नु. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आप्पा बळवंत चौकाजवळ, बाजीराव रोड, पुणे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने क्रीडा प्रेमी, कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा हक्काचा आधार असलेला नेता गमावला आहे.

या शोकसभेस खो-खो परिवारातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पुरस्कार्थी, क्रीडा संघटक, खो-खो प्रेमी व सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!