क्रीडामुख्य बातमी

जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरची सुवर्ण, कांस्यपदकाची कमाई

रत्नागिरी : येथे पार पडलेल्या १९ व्या रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज पुमसे व क्युरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६ मध्ये एसआरके तायक्वांदो क्लबची खेळाडू सुवर्णकन्या स्वरा साखळकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत २ सुवर्णपदके आणि १ कास्यदकाची कमाई केली.

स्वरा हिने आजपर्यंत तायक्वांदो खेळात ३८ सुवर्णपदके, १५ रौप्यपदके, तर ८ कास्यपदके अशी एकूण ६१ पदकांची कमाई केली आहे. ही स्पर्धा नुकतीच रत्नागिरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडली. जिल्ह्यातील एकूण ७०० नामवंत खेळाडूंमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत स्वराने आपल्या कौशल्याचे आणि मेहनतीचे दर्शन घडवले. या यशामागे तिचे प्रशिक्षक तसेच अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवणारे एसआरके तायक्वांदो संस्थेचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख सर तसेच तिचे आई-वडील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

स्वरा ही नगरपालिका शाळा क्रमांक १५ दामले विद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोटे, क्रीडा शिक्षक श्री. शेंडगे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे , तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप, तालुका समन्वयक विनोद मयेकर, महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत, क्लबचे  अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली  सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर  मुख्याध्यापक, पालक, क्रीडाशिक्षक, संस्थेचे संचालक, तायक्वांदो क्लबचे सर्व पदाधिकारी, पालक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!