मुख्य बातमी

सशक्त भारतासाठी पंचपरिवर्तन स्वीकारावे : सचिन वहाळकर

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्यावर भाजपा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने व्याख्यान

रत्नागिरी : भारतीय जनसंघाचे थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारतासाठी योगदान दिले. आज सशक्त, समृद्ध व विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या आचरणात आपण पंचपरिवर्तन स्वीकारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी केले.

भारतातील थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्ष रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याच्या वतीने देवरूख येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जीवनप्रवास, भारताच्या जडणघडणीत त्यांचे अमूल्य योगदान सांगितले. विकसित आणि आत्मनिर्भर भारताची उभारणी केवळ शासनाच्या योजनांमुळे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या आचरणातील सकारात्मक परिवर्तनामुळे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेले पंचपरिवर्तन हे केवळ संघटनात्मक अभियान नसून विकसित भारताच्या दिशेने प्रत्येक नागरिकाने स्वीकारावयाची जीवनशैली आहे. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आणि ‘स्व’बोध या पंचसूत्रांचा स्वीकार करूनच डॉ. मुखर्जी यांचे राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न अधिक प्रभावीपणे साकार होऊ शकते, असे प्रतिपादन वहाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संयोजक सुशांत मुळ्ये यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा उद्देश सांगितले. भाजप संगमेश्वर दक्षिण मंडल अध्यक्ष रूपेश कदम यांनी वक्ते सचिन वहाळकर यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा चिटणीस प्रकाश लेले, संगमेश्वर दक्षिण मंडल अध्यक्ष रूपेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित शेट्ये, देवरूखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, अनुसुचित जाती मंडल अध्यक्ष जाधव, गटनेत्या सौ. स्वाती राजवाडे, नगरसेविका सौ. कविता नार्वेकर, सौ. श्रद्धा इंदुलकर, सौ. समृद्धी वेलवणकर, नगरसेवक रूपेश भागवत, क्रीडा सेल जिल्हा संयचजक दत्ता नार्वेकर, तालुका क्रीडा संयोजक संदिप वेलवणकर, ज्येष्ठ नेते मुकूंद जोशी, जिल्हा सदस्य सदानंद राजवाडे, तुकाराम किरवे, रेश्मा किरवे, शंकर मालप आदी उपस्थित होते. दक्षिण रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक सुशांत मुळये यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!