मुख्य बातमी

गावखडीतील श्री स्वामी समर्थ मठात उद्या श्री क्षेत्र अक्कलकोट येथील पालखीचे आगमन  

गावखडी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथून श्री स्वामी देवांची पालखी परिक्रमा मूळ पादुकांचे आगमन होणार असून, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री क्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ येथे उद्या (१८ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजता येणार आहेत. दर्शनाची वेळ सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत आहे. दुपारी १२ वाजता श्री स्वामी देवांना नैवेद्य अर्पण करून महाआरती होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

स्वामी भक्तांनी मठामधे उपस्थित रहावे आणि पालखी सोहळ्यामधे सहभागी होऊन श्री स्वामी देवांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ गांवखडी व श्री स्वामी समर्थ दिगंबर चँरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व श्री स्वामीभक्तांनी व मठातील सर्व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी देवांच्या स्वागतासाठी सकाळी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!