कोतवडे गावणवाडीची सत्यनारायण महापूजा संपन्न

रत्नागिरी : गावणवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते. या निमित्ताने श्री माऊली एंटरटेन्मेंट मुंबई प्रस्तुत “का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला” नाट्य प्रयोग झाला.
या नाट्यप्रयोगात संतोष भातडे, दामोदर गोरीवले, अनिल मांजरेकर, दीपक घाणेकर, अमोल घाणेकर, अमोल मांडवकर, शैलेश जोशी आणि सिने अभिनेत्री श्वेताली अडसूळ या कलाकारांचा सहभाग होता. या नाटकाचे गणेश हिर्लेकर लिखित आणि गोपीचंद्र देसाई दिग्दर्शित या नाटकाचे निर्माते अनंत गोताड, असून त्याला कल्पेश सोलकर यांचे संगीत होते. नृत्यदिग्दर्शक म्हणून भावेश गोवळकर यांनी काम पाहिले. रवी गोवळकर, बबलू सावंत यांनी प्रकाश योजनेची बाजू सांभाळली.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या सामाजिक व वैवाहिक जीवनावर भाष्य करणारे कौटुंबिक नाटक कोतवडे पंचक्रोशीतील तमाम रसिकांना मनाला भावले. अतिशय उत्तम प्रकारच्या अभिनयाची जुगलबंदी कोतवडे पंचक्रोशीतील रसिकांना पहावयास मिळाली.


