मुख्य बातमी
आरे-वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

रत्नागिरी : आरे-वारे समुद्रात आज (२९ मार्च) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडली. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून, एकाला स्थानिक ग्रामस्थ आणि येथील पोलिस पाटील आदेश कदम यांनी वाचवत जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
संतोष शशिकांत भानुशाली (पालघर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर सुयोग राजेश भानुशाली (विरार) असे बचावलेल्या पर्यटकाचे नाव आहे. पालघर येथून हे कुटुंब रविवारी सकाळी आरे वारे येथे दाखल झाले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोघे समुद्रात बुडाले. यातील एकाचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आले.



