मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
कुटगिरी गावामध्ये प्रथमच शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) : युवा पिढीच्या सहकार्याने कुटगिरी गावठाण तरुण विकास मंडळ यांच्या विद्यमाने प्रथमच शिवजयंतीचा सोहळा कुटगिरी साहणेवर पार पडला.
यावेळी कासारदुर्ग ते कुटगिरी अशी शिवज्योत घेऊन संपूर्ण गावामध्ये रॅली काढण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर गावातील लहान थोरांनी भाषण आणि विचार मांडले. शिवजयंतीनिमित्त युवापिढीने भव्य अंडर आर्म नाईट बॉक्स क्रिकेट दोन दिवस स्पर्धेचे आयोजन केले होते. गावठाण वाडीतील युवापिढीने चांगल्या प्रकारे दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन केले होते.
या कार्यक्रमाला गावातील आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे गावठण तरुण विकास मंडळाचे वाडी अध्यक्ष मंगेश उर्फ भाई खेतले यांनी आभार मानले.


