जीडीसी अँड ए व सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास १० मार्चपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास १० मार्च रोजी रात्री ८ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही परीक्षा २६, २७ व २८ मे २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत १३ मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा व आपले अर्ज दाखल करतांना “रत्नागिरी” या केंद्रांची नोंद घेवून अर्ज दाखल करावेत.
ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ८२१/अ, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पतपेढी इमारत, पहिला मजला, कॅनरा बँकेजवळ, के.एस.पी रेसीडेन्सी समोर, आरोग्य मंदिर, मजगांव रोड, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन केंद्रप्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.



