मध्य पूर्व या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती; रत्नागिरी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक सूचना जारी

मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी करण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
या संदर्भात मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) संपर्क साधण्यात आलेला असून, कोणत्याही नागरिकाकडून युद्ध जन्य ठिकाणी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांना कळविण्यात येईल.
या बाबीची नोंद घेऊन नागरिकांनी आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा व खालील प्रमाणे माहिती द्यावी
1. संपूर्ण नाव
2. संपर्क क्रमांक
3. पासपोर्ट क्रमांक
4. पासपोर्ट बायोडेटा झेरॉक्स कॉपी
5. UAE मधील स्थानिक संपर्क क्रमांक
6. व्हाट्सअप क्रमांक
7. ई-मेल आयडी
8. दुबईमधील सध्याचे ठिकाण
9. मुख्या अडचण
10. व्हिसा प्रकार – पर्यटक/निवासी
11. व्हिसा अंतिम तारीख
12. रत्नागिरी जिल्ह्यातील संपूर्ण पत्ता व पीन क्रमांक
13. नातेवाईक यांचा संपर्क क्रमांक
*नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :*
* जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी नियंत्रण कक्ष* : 02352 /222233. मोबाईल – 7057222233
* रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्ष – 02352 / 222222
* मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई – 022 – 22027990. मोबाईल 9321587143



