मुख्य बातमी

जिल्हास्तरीय कब-बुलबुल मेळाव्यात ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरची चमकदार कामगिरी

रत्नागिरी : चिपळूण येथे भारत स्काऊट आणि गाईड आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय कब – बुलबुल मेळाव्यात येथील कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर शाळेने उल्लेखनीय यश मिळवले.

शाळेतील इयत्ता चौथीतील ६ कब विराज सावंत, भाविक चव्हाण, श्रीराज पवार, वेद नेवरेकर, देवांश गराटे, स्मित आंबेकर आणि ६ बुलबुल ओवी आंबेकर, गार्गी आखाडे, मीरा झगडे, उर्वी कळंबटे, क्रितिका हरचकर, सावी भोसले यांच्यासह हणमंत ऐवळे, नेहा राजेशिर्के व गायत्री औघडे हे मार्गदर्शक शिक्षक सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना मुख्याध्यापिका सायली राजवाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेने पहिल्यांदाच या जिल्हास्तरीय मेळाव्यात सहभाग नोंदवला होता.

यातील विशेष कौतुकाची आणि अभिनंदनीय गोष्ट म्हणजे तेथे झालेल्या स्पर्धांमध्ये मुलांनी (कब) शारीरिक प्रात्यक्षिक स्पर्धा, हस्तकौशल्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामधे ३ ट्रॉफी व मुलींनी (बुलबुल) शारीरिक प्रात्यक्षिक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये २ ट्रॉफी मिळवले. सहभागाची १ ट्रॉफी अशा एकूण ६ ट्रॉफी मिळवून पहिल्याच वर्षी कौतुकास्पद कामगिरी करून शाळेचे नाव उंचावले आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि र. ए. सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य मनोज पाटणकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि मुख्याध्यापिका श्रीमती राजवाडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!