
राजापूर : तालुक्यातील वाटुळ तिठा येथे चिपळूणवरून गोव्याच्या दिशेने जात असताना शामकांत पाटणे यांच्या व्हॅगनार (एमएच-०५-डीएच-०३९२) या कारला अपघात झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, भांबेडकडून येताना वाटुळ तिठ्यातील उतारावर अचानक एक कुत्रा गाडीसमोर आडवा आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला जाऊन थेट श्री. सावंत यांच्या घराच्या अंगणात घुसली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र पाटणे व त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे. वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत गाडीतील लोकांना बाहेर काढण्यास मदत केली.



