मुख्य बातमी

रत्नागिरीत १६ मार्च रोजी विभागीय स्तरावर डाक अदालत

रत्नागिरी : येथील अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालयामार्फत विभागीय स्तरावरील डाक अदालत येथे आयोजित केली आहे. ही अदालत १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारील कार्यालयात होणार आहे.

पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्या नावे १२ मार्चपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!