मुख्य बातमी

जांभेकर विद्यालयात स्वातंत्र्यदिनी गुणवंतांचा विशेष गौरव

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी होत्या. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

मुख्याध्यापिका सौ. तारी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी ध्वजगीत, राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थी तसेच मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांना देशभक्तीची शपथ देण्यात आली. प्रशालेतील एनसीसीच्या छात्रांनी शपथ घेतली. विद्यार्थ्यांना नशामुक्त व तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्याची शपथ देण्यात आली. एनसीसी छात्रांनी शिस्तबद्ध संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली.

या वेळी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या अक्षरा खामकर व कुमारी आर्या दर्डे यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका वैभवी नाखरेकर, सौ. समीक्षा सचिन लिंगायत व सौ. समीक्षा कमलाकर लिंगायत यांचाही गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना २०० गणवेश मोफत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या सौ. शुभांगी अभ्यंकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रशालेची पटसंख्या वाढविण्यासाठी सहकार्य करणारे पालक श्री. मेस्त्री, तसेच शिक्षक अनिल सागवेकर, स्नेहल पावरी, वैभवी नाखरेकर, समीक्षा कमलाकर लिंगायत, शुभांगी अभ्यंकर, पूनम नाटेकर, दिव्यता नागवेकर, गुरव, महेंद्र पवार, सेविका शलाका जोशी, सेवक भोंबल, मुख्याध्यापिका सौ. संजना तारी यांचा पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष गोरीवले यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!