मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

टंचाईवर मात करण्यासाठी स्रोत बळकटीकरण महत्त्वाचे

संगमेश्वर पंचायत समितीचे गटअधिकारी भरत चौगुले यांचे प्रतिपादन

संगमेश्वर : “टंचाई वरती मात करण्यासाठी स्रोत बळकटीकरण करणे अत्यंत गरजेचे असून, कोकणात ३ हजार ते साडेतीन हजार मिमी पाऊस पडूनही ३ महिन्यांसाठी लोकांना पाण्यासाठी इतर स्रोतावर अवलंबून राहावे लागते, किंबहुना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशावेळी दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यासाठी स्रोत बळकटीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन संगमेश्वर गटविकास अधिकारी भरत चौगुले यांनी केले.

जलजीवन मिशन अंतर्गत स्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण या दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण देवरुख येथील माटे-भोजने सभागृहात २६ मे ते ३० मे या कालावधीत आयोजित केलेले होते. गटविकास अधिकारी भरत चौगुले, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद शिंदे, उपअभियंता (ग्रा.पा. पु) अभिजीत कांबळे, विस्ताराधिकारी (ग्रा.पं) शंकर घुले यांच्या उपस्थित शुभारंभ पार पडला. प्रशिक्षणादरम्यान ५ जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर कांदळवन रोपाचे व SWSM स्तरावरून देण्यात आलेले FTK kit चा तालुकास्तरावर शुभारंभ करून प्राथमिक स्वरूपात ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!