मुख्य बातमी

देव घैसास कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा रत्नागिरी उपपरिसर येथे एकदिवसीय कार्यशाळेत सहभाग

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव घैसास कीर कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष व द्वितीय वर्ष विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर येथे “Environmental Vision: Integrative Academia-Industry Dialogue” या एकदिवसीय कार्यशाळेत सहभाग घेतला होता.

१७ मार्च रोजी मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर येथे पर्यावरणशास्त्र विभागाकडून “Environmental Vision: Integrative Academia-Industry Dialogue” नामक एकदिवसीय विनामूल्य कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना पर्यावरणीय दृष्टिकोन व औद्योगिक क्षेत्र यांची सांगड घालण्याचे मार्गदर्शन करण्यात मोलाची भूमिका बजावेल अशा प्रकारे आयोजित केली होती.

सर्वप्रथम पर्यावरणशास्त्र विभागाच्या सहा. प्रा. ऋजुदा जाधव यांनी कार्यक्रमास सकाळच्या सत्रासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सकाळ सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आसमंत फाउंडेशनचे संस्थापक-संचालक नंदकुमार पटवर्धन, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल सावंत, आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे येथील जैवविविधता व पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सोनाली शिंदे तसेच रत्नागिरी उपपरिसराचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी व सहा. कुलसचिव अभिनंदन बोरगावे उपस्थित होते.

स्वागत समारंभ संपताच मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराचे पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख, डॉ. पांडुरंग पाटील यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून दिला. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालकांचे मनोगत झाल्यावर नंदकुमार पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर डॉ. सोनाली शिंदे व डॉ. प्रफुल्ल सावंत यांनी आपापल्या तज्ज्ञ विषयांना अनुसरून कार्यशाळेला मार्गदर्शन केले. याचसोबत कार्यशाळेच्या सकाळ सत्राची सांगता झाली.

मध्यान्ह कार्यशाळेचे दुपारचे सत्र सुरू करण्यात आले. दुपारच्या सत्रासाठी गद्रे मरीन प्रा.लि. चे चेअरमन दीपक गद्रे, भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे अतिरिक्त मुख्य अभियंता आशुतोष शेवपुरे, सडेकर एन्विरोटेक प्रा. लि. चे संचालक प्रभाकर सडेकर व डॉ. प्रफुल्ल सावंत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. श्री. गद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यशाळेच्या अनुषंगाने छोटेखानी चर्चा केली.

पुढचा एक तास प्रमुख पाहुण्यांची भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांनी कार्यशाळेसाठी जमलेल्या सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्यासोबत पर्यावरणीय दृष्टिकोनातून उद्योजकतेबाबत चर्चा केली. चर्चा संपताच सर्व विद्यार्थ्यांसाठी Climate Skills Activity चे आयोजन केले गेले. या कार्यशाळेला आपल्या महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख सहा. प्रा. सानिका कीर व रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख सहा. प्रा. आसावरी मयेकर उपस्थित होत्या. सरतेशेवटी आभार प्रदर्शनाचा औपचारिक कार्यक्रम करून कार्यशाळेची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!