मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उद्या जिल्हा वार्षिक मेळावा

गुहागरमधील पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये आयोजन

आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक मेळावा उद्या (४ जानेवारी) रोजी गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे आयोजित करण्यात आला आहे. या वार्षिक मेळाव्याचे अध्यक्षपद गुहागरचे माजी आमदार विनय नातू भूषविणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, शिक्षक आमदार व राज्य कार्याध्यक्ष ना. गो. गाणार, शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कोकण विभागाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, कोकण विभागाचे कार्यवाह लक्ष्मण वालगुडे, कोकण विभागाचे माजी अध्यक्ष रवींद्र इनामदार, कोकण विभागाचे कोषाध्यक्ष प्रकाश पाटील, कोकण विभागाचे सहकार्यवाह सुनील गौड, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, कार्यवाह पांडुरंग पाचकुडे, कोषाध्यक्ष राजन नाईक, कार्याध्यक्ष किरण देशपांडे, महिला संघटिका काजल राऊत, रत्नागिरी जिल्हा संघटक गणेश कुलकर्णी, जिल्हा सहकार्यवाह विनायक जाधव, गुहागर तालुका अध्यक्ष सुमंत भिडे, कार्यवाह शावरी बंदीछोडे, सल्लागार मंगेश गोरीवले, संजीव मोरे, महिला आघाडी प्रमुख राधा शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक मेळाव्यात ईशस्तवन व स्वागत गीत, मान्यवरांचे स्वागत व सत्कार, कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पुरस्कार वितरण व गुणगौरव कार्यक्रम, शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्या, संघटनेची भूमिका व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन, मान्यवरांचे मनोगत, शंका समाधान व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत. रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक मेळाव्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हास्तरीय व गुहागर तालुकास्तरीय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!