जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा रत्नागिरीच्या वतीने वृक्षारोपण

रत्नागिरी : जागतिक पर्यायावर दिनानिमित्त ५ जून रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार तसेच जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी झाडे उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला शहराध्यक्ष सौ. पल्लवी पाटील, राजन पटवर्धन, शेखर लेले, मनोज पाटणकर, शैलेश बेर्डे, निलेश आखाडे, सौ. सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर, सायली बेर्डे, भक्ती दळी, दीप्ती फडके, संतोष बोरकर, मंदार खंडकर, नितीन गांगण, तुषार देसाई, गुरू पाठक, मनोर दळी, ओंकार फडके, नेहा ठावरे, तेजस ठावरे, हर्षद मिरकर, बाबू सावंत आदी उपस्थित होते. हवामान खात्याचे अधिकारी राजेश सोनार यांनी भाजपच्या वतीने केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाबाबत कृतन्यता व्यक्त केली तसेच राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.




