मुख्य बातमी
गणेशगुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मूळ स्थानी शिलालेख अनावरण

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराच्या मूळ स्थानी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिलालेख अनावरण होणार आहे. या कार्यक्रम रविवार (९ नोव्हेंबर) संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेमध्ये पार पडेल.
या वेळी गणेशगुळे गावच्या माजी सरपंच सौ. श्रावणी विक्रांत रांगणकर, प्रमुख वक्त्या सौ. पद्मजा अभ्यंकर, सहकार्यवाहिका कोकण प्रांत सौ. मीरा भिडे, दक्षिण रत्नागिरी रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्षा सौ. दीपा पाटकर, कोकण प्रांत सहकार्यवाहिका सौ. उमा दांडेकर आणि ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
गणेशगुळेतील अथर्व कोकोनट रिसॉर्ट येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



