रत्नागिरी वर्षावास कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी : दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका जिल्हा शाखा रत्नागिरी, यांचे वतीने आज (२९ जुलै) सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन (सिव्हिल हॉस्पिटल शेजारी) येथे वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष एल. व्ही. पवार यांनी भूषविले. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक सीताराम जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरीचे संस्कार विभाग जिल्हाध्यक्ष जे. आर. गमरे यांच्या अधिपत्याखाली विधी संचालन पार पडले.
या कार्यक्रमानिमित्त प्रमुख वक्ते जे. आर. गमरे, संजय जाधव, सुरेंद्र जाधव, मुकुंद कांबळे, (तालुका अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी), दीपक जाधव (सचिव, भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र प्रदेश), एल. व्ही. पवार (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रत्नागिरी), शिवराम विठ्ठल कदम, (कोषाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी), प्रकाश पवार, सौ. अस्मिता कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास सौ. दीपाली जाधव (उपाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्हा) सौ. अस्मिता कांबळे, (तालुका अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी), सौ. मानसी तांबे, प्रदीप भिकाजी पवार (सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन रत्नागिरी), मुकुंद राया कांबळे (तालुका अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी), अभिजीत तांबे (तालुका सचिव भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी), मनोज कांबळे, सुरेंद्र जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत तांबे यांनी केले.



