मुख्य बातमी
मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम करण्यात आले होते. यानिमित्त भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, तर ९ वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर १२ वाजण्याच्या सुमारास पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला. १२.३० वाजता आरती झाल्यानंतर उपस्थित सर्व भक्तगणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर, भाविक भक्तगण यांनी परिश्रम घेतले.
फोटो सौजन्य : दिनेश पेटकर, गावखडी



