मुख्य बातमी

दिव्यांग सप्ताहाची सांगता

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित दिव्यांग सप्ताहाचा सांगता समारंभ नुकताच झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा/कार्यशाळा तसेच दिव्यांगांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने हा समारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील विशेष शाळा/कार्यशाळे मधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आलेले होते. प्राविण्य प्राप्त दिव्यांग विद्यार्थ्यांना पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

दिव्यांगांसाठी चॅटबॉटवरील सोयी-सुविधा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ चा कायदा, दिव्यांगत्व जन्माला येवू नये यावर उपयोजना, शासकीय योजना, दिव्यांग वित्तीय महामंडळ यांचेकडील योजना व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र याबाबत माहितीपर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमात मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व त्यांचे अधिनस्त सर्व कर्मचारी, जिल्हा परिषदेमधील सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

विशेष शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, तालुकास्तरावरील विशेष शिक्षक, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील इतर दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!