महाराष्ट्रमुख्य बातमी

राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के 

कोकण विभाग ९७.६२ टक्क्यांसह राज्यात अव्वल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत निकालात २ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र, परंपरेनुसार यंदाही निकालाच्या टक्केवारीत मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने ९७.६२ टक्के निकालासह पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८.४१ टक्के लागला असून, या विभागात निकालाची टक्केवारी सर्वात कमी नोंदवण्यात आली आहे.

राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून मुलींचा निकाल ९४.९६ टक्के आणि मुलांचा निकाल ९०.५६ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल असलेला विभाग असून कोकण बोर्डाचा निकाल (९७.६२ टक्के) तर सर्वात कमी निकाल असलेला विभाग छत्रपती संभाजीनगर (८८.४१ टक्के) आहे.

यंदाच्या निकालातही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल ९४.९६ टक्के लागला आहे, तर मुलांचा निकाल ९०.५६ टक्के इतका आहे. बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीतही मुलींनी आपली आघाडी कायम राखली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!