मुख्य बातमी

नगरसेविका पूजा पवार यांच्यातर्फे आयोजित समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : नगरपालिकेचा महिला व बालकल्याण समिती पूजा पवार यांच्या वतीने शहरातील बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर येथे लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिर आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, महिला व बाल कल्याण समिती सभापती प्रीती सुर्वे, उपसभापती पूजा पवार, नगरसेविका श्रद्धा हळदणकर, मेधा कुलकर्णी, जागृती पिलणकर, निवेदिता कळंबटे, फौजिया मुजावर, आफ्रिन होडेकर, सायली बेर्डे, भक्ती दळी, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या शिबिरात मजेदार खेळ, एरोबिक्स, चित्रकला, डान्स, वाळू शिल्प असे विविध प्रकारचे उपक्रम या घेण्यात आले. यांमधून मुलांना खूप अनुभव घेता आले. श्रीकांत ढालकर यांनी दाखवलेला बोलक्या बाहुल्यांचा खेळ हा हा शिबिराचे विशेष आकर्षण ठरला. या खेळाबरोबच त्यांनी विविध पक्ष्यांचे आवाज काढून दाखवत मुलांना एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणली. आज या शिबिरात वाळू शिल्प साकारण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, समुद्री घोडा आणि गणपतीचे वाळू शिल्प यांचा समावेश होता.

दरम्यान, आज (८ मे) या शिबिराचा शेवटचा दिवस असणार आहे. या शिबिरासाठी यश पवार, श्रीयोग चव्हाण, शौर्य मांजरेकर, राजस वने, प्रणित चिले, रोहित शिंदे आदी मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!