मुख्य बातमी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा इशारा

रत्नागिरी : येत्या तीन तासांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मध्यम स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळी पावसाची दाट शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



