जीजीपीएस प्रशालेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : जिल्ह्यातील १० वर्षांखालील व १४ वर्षांखालील वयोगटातील रग्बी खेळाडूंची निवडचाचणी २६ मार्च रोजी चिपळूणमधील दलवाई हायस्कूलमध्ये घेण्यात आली. यामध्ये श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेच्या खेळाडूंची २९ मार्च रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टच रग्बी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१० वर्षांखालील मुली : अन्वी विनोद रामगडे, काव्या प्रकाश संते, शार्वी अनिकेत साळोखे, सारा सुशील कांबळे, प्राप्ती प्रवीण साळवी, दुर्वा मनोज डोळे, अस्मी विकास कुरतडकर.
१० वर्षांखालील मुलगे : मोहम्मद अर्श फैजल फणसोपकर, दर्श राजेश कांबळे, अद्विक वैभव बागवे, शनय गणेश कांबळे, प्रणित हेमंत ऐवळे.
१४ वर्षांखालील मुली : मुद्रा शैलेश चव्हाण, धनश्री महेश नाईक, मनस्वी योगेश आचरेकर.
या विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक कौशल मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल गुरुकुल विभाग प्रमुख वासुदेव परांजपे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. अपूर्वा मुरकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शुभदा पटवर्धन तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.



