मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

लक्ष्मी ऑरगॅनिक्सविरोधी आंदोलकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 

लक्ष्मी ऑरगॅनिक्सविरोधी आंदोलकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

 

खेड : लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पाठिंबा दिला असून खुद्द पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी या आंदोलनकर्त्यांच्या समस्या आणि आंदोलना पाठीमागील उद्देश जाणून घेतला.

कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि जनक जन आक्रोश समितीच्या प्रतिनिधींनी मुंबई येथे जाऊन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील आंदोलनाचा उद्देश हा स्पष्ट आणि जनहितार्थ आहे हे सांगितले. कोकणचा निसर्ग आणि मानवी जीवन वाचविण्यासाठी पी फास सारखे घातक रसायन निर्मिती करणाऱ्या लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील लढ्याला आपण आपल्या पक्षाकडून पाठिंबा द्यावा अशी विनंती एका निवेदनाद्वारे केली.

राज ठाकरे यांनी याबाबत संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले आणि जिथे जिथे गरज लागेल तिथे मनसे या लढ्यामध्ये तुमच्या सोबत आहे असे सांगितले. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या बरोबर आहे असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण मुंबई संपर्क उपाध्यक्ष मनीष पात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना खेड तालुका अध्यक्ष मंगेश चाळके, लोटे पंचकोशी पर्यावरण संरक्षण समितीचे पदाधिकारी तसेच कोकण नागरी संघर्ष समिती आणि जनआक्रोश समितीचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!