मुख्य बातमी

श्री झरीविनायक मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा ९ एप्रिल रोजी 

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये किनाऱ्यावरील श्री झरीविनायक मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा गुरुवारी (९ एप्रिल) रोजी आयोजित करण्यात आला आहे.

भाट्ये येथील श्री झरीविनायक मंदिराचे वर्षभरापूर्वी नूतनीकरणाने नवा साज चढवण्यात आला आहे. स्थानिकांसह पर्यटकांनी नेहेमीच गजबजलेल्या या मंदिराला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा ९ एप्रिल रोजी साजरा करण्यात असून, दुपारी १२ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

या प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री झरीविनायक मित्र मंडळ भाट्ये यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!