भाजपा खेडतर्फे भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा

खेड : भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापन दिनानिमित्त भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर प्रभाग क्रमांक ६ च्या विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर यांच्या वॉर्डमधील पदुमले वाडी (समाज मंदिर) येथे शिबिर संपन्न झाले.
या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲड. खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद नांदगांवकर, नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये, सौ. प्रीती चिखले, राधेश्याम वर्मा, वैजेश सागवेकर, संदीप सासणे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अनिकेत पवार, केदार वणजू, विजय गुप्ता, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

