रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या १९ मंडल अध्यक्षांची निवड
महाराष्ट्रात २५८ नव्या मंडळांची स्थापना, ९६३ कार्यरत मंडळांतून पक्षशक्ती अधिक भक्कम : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याची तयारी

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) महाराष्ट्र प्रदेश संघटनेत महत्त्वाचा टप्पा २० एप्रिल रोजी पार पडला. यानुसार राज्यभरात एकूण १२२१ मंडलापैकी ९६३ मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. यात रत्नागिरी जिल्ह्यात १९ मंडल अध्यक्षांची निवड घोषित करण्यात आली. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पूर्ण झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने पावले टाकली आहेत. संघटन हेच खरे बळ या तत्त्वावर चालत, भाजपने महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागांतील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरतोय. संपूर्ण राज्यभर १२२१ मंडळ गठीत करण्यात आले आहेत, त्यापैकी ९६३ मंडळांची रचना जाहीर करण्यात आली असून, यातील २५८ मंडळे नव्यानं स्थापन केली गेली आहेत.
मंडळ गठीत करण्यात आले आहेत. या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यातून भाजपच्या कार्यपद्धतीतील शिस्त, संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होते. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. भाजपची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याचा ध्यास घेतेय.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडल अध्यक्षांची नावे
रत्नागिरी उत्तर- दापोली शहर- सौ. जया साळवी, ग्रामीण सचिन होडवे, खेड उत्तर- ऋषिकेश मोरे, दक्षिण- विनोद चाळके, मंडणगड प्रवीण कदम, गुहागर अभय भाटकर, चिपळूण ग्रामीण पश्चिम- उदय घाग.
रत्नागिरी दक्षिण- मंडलाचे नाव, नूतन अध्यक्षाचे नाव या क्रमाने- चिपळूण ग्रामीण- विनोद भुरण, चिपळूण शहर- शशिकांत मोदी, संगमेश्वर उत्तर- विनोद म्हस्के, संगमेश्वर दक्षिण- रूपेश कदम, रत्नागिरी शहर- परशुराम उर्फ दादा ढेकणे, दक्षिण संयोग तथा दादा दळी, मध्ये- प्रतीक देसाई, उत्तर- विवेक सुर्वे, लांजा दक्षिण शैलेश खामकर, उत्तर- विराज हरमले, राजापूर पश्चिम मोहन घुमे, पूर्व- एकनाथ मुंढे.



