मुख्य बातमी

कोतवडे हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कोतवडे हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजर

 

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.

या वेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे कार्यकारणी सदस्य प्रकाश ठोंबरे, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार, ज्येष्ठ शिक्षक सुरेश नाईक, शिक्षिका शिल्पा सुर्वे, गुरुदास खुळे, सचिन कोलगे, सुभाष खरात, सविता मोहिते, शरदचंद्र कुंभार, आशिष जाधव, ईशा पेडणेकर, दत्ताराम लिंगायत, विक्रम बागुल, अवनी शितूत, संदीप कोलगे, प्रमोद पांचाळ, गीता खांडके, शुभम सनगरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षण क्षेत्रावर ती फार मोठी जबाबदारी येऊन पडल्याचे सांगितले. भारतीय संविधान आबादीत ठेवायचे असेल, तर देशविघातक प्रवृत्ती यांना वेळीच आवरणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. यावेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष संजय मयेकर, कार्यवाह संजय कोलगे, सहकार्यवाह राजेंद्र फणसोपकर यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुरेश नाईक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!