मुख्य बातमी

अप्लाईड आर्ट कॉलेजमध्ये “इलस्ट्रेशन डेमो आणि गाईडन्स” कार्यशाळेचे आयोजन

विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य

रत्नागिरी : येथील उज्वल शिक्षण संस्थेच्या आगम अप्लाईड आर्ट कॉलेजमध्ये डिझाईन व कला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली असून इलस्ट्रेशन डेमो आणि गाईडन्स (One Day for Illustration – Demo & Guidance) या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आली असून, यात सुप्रसिद्ध ग्राफिक डिझाईनर व इलस्ट्रेटर अनिश दाते  हे कार्यशाळेमध्ये इलस्ट्रेशन या विषयाचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना कन्सेप्ट डेव्हलपमेंट, विविध मीडिया चा वापर, लेआऊट व कॉम्पोसिशन, प्रॉडक्शन प्रोसेस तसेच इलस्ट्रेशन टेकनिकस याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाची समज व व्यावहारिक अनुभव मिळण्यास मदत होणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. डिझाईन क्षेत्रात आपली दिशा ठरवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मर्यादित प्रवेश असल्यामुळे 9527008676 या क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!