आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोतवडे (ता. रत्नागिरी) जिल्हा परिषद गटाच्या बैठकीत शिवसैनिकांना आदेश

रत्नागिरी : प्रत्येक गावातील शाखाप्रमुख, गटप्रमुख, बुथप्रमुख, बीएलएल यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका समोर ठेऊन प्रत्येक घराघरापर्यंत जावे, मतदारांच्या व शिवसैनिकांच्या गाठीभेठी करण्यास सुरुवात करावी. जेणेकरून मतदारांचे स्थानिक प्रश्न आपल्या संघटनेच्या माध्यमातून सोडविता येतील. त्यांच्या अडी-अडचणी सोडविता येतील. त्यामुळे प्रत्येकाने कामाला सुरुवात करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

तालुक्यात शिवसेना नेते सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क दौरा आज (३ जून) कोतवडे जिल्हा परिषद गटात माजी आमदार बाळासाहेब माने, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या बैठकीला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत तळागाळातील शिवसैनिक आजही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच असल्याचे दाखवून दिले.

या बैठकीला तालुकासंघटक तथा माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय मयेकर, शहरसंघटक प्रसाद सावंत, युवासेना तालुका अधिकारी संदेश नारगुडे, युवासेना तालुका समन्वयक साईनाथ जाधव, उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख उत्तम मोरे, किरण तोडणकर, नयन साळवी, मयुरेश पाटील, विभागसंघटक प्रवीण साळवी, उपविभागप्रमुख गजानन गिड्ये, नंदकुमार कदम यांच्यासह शाखाप्रमुख, गटप्रमुख, बुथप्रमुख, बीएलए व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


