मुख्य बातमी

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध

रत्नागिरी : राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने १ डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे.

परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. परीक्षार्थी/उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!