आरोग्यमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गोरेगाव येथे प्रबोधन मित्र मंडळातर्फे (ट्रस्ट) दोन दिवसीय आरोग्य शिबिर उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : प्रबोधन मित्र मंडळ (ट्रस्ट) आयोजित फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई शाखा यांच्या माध्यमातून गोरेगाव (प.) मुंबई येथील चंद्रमणी बुध्द विहार, तीनडोंगरी यशवंत नगर रोड नं-१ येथे दोन दिवसीय निःशुल्क भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

यावेळी संस्थापक-अध्यक्ष (समाजसेवक) किरण जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी दत्ता सावंत, सतीश लाड, विशाल इनकर, राम पाटील, श्रीनिवास गर्गे, सुरेश मेंगू, अविनाश मस्तुद, महेश दिटी, नरेश मुधारी, सतीश दिटी, यादगिरी नागुला, नरेश रागला तसेच महात्मा फुले व इतर स्थानिक सोसायटीचे अशोक गायकवाड, मोहन इनकर, मिलिंद जाधव, गौतम औसरमल तसेच अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!