मनसेतर्फे उद्या रत्नागिरी नगरपालिकेवर धडक मोर्चा

रत्नागिरी : शहरातील गैरकारभाराविरोधात मनसेतर्फे उद्या (१३ जून) पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. करदात्या जागृत नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे व आपला रोष व्यक्त करावा, असे आवाहन शहर सचिव गौरव चव्हाण यांनी केले आहे.
मुख्याधिकारी पदी वैभव गारवे यांनी पदभार स्वीकारल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, महेंद्र गुळेकर, शहरअध्यक्ष बाबय भाटकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना रत्नागिरी शहरातील दुरावस्था प्रेजेंटेशनच्या माध्यमातून दाखवणार आहे. कारण मुख्याधिकारी बदलत असतात, पण प्रत्येक विभागाचे अधिकारी हे स्थानिकच आहेत. कित्येक वर्षे इथेच असून देखील त्यांना त्याचे काहीच पडलेलं नाहीये.
शहरातील अंतर्गत भागातील खराब रस्ते पावसाळ्या पूर्वी दुरुस्त करणे गरजेचे होते पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. गटारांची बांधकामे पावसापूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते, ती देखील अपूर्ण आहेत. अशा अनेक गोष्टी अपूर्ण आहेत. पालकमंत्री विकास कामाकरिता आग्रही असताना निधीची कमतरता जाणवू न देता सुद्धा अधिकारी आपले नियोजित कामे करू शकत नाहीत.
सामान्य जनतेच्यावतीने न प प्रशासनाला जाब विचारण्यासाठी १३ जून रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे.


