मुख्य बातमी
काम वाटप समिती सभा ५ मे रोजी

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सुशिक्षीत बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्याकरिता काम वाटप समिती सभा ५ मे रोजी दुपारी १२ वाजता कै. शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेली असल्याचे सदस्य सचिव काम वाटप समिती, जि.प. तथा कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
सभेमध्ये १० लाख रुपयांच्या आतील कामांचे वाटप होणार आहे. ५ मे रोजी दुपारी १२ वाजता मजूकर सहकारी संस्था , सुशिक्षीत बेरोजगारा अभियंता (विद्युत) आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंता (स्थापत्य) साठी काम वाटप करण्यात येणार आहे.



