सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान

सुकापूर : महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुकापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये हळदीकुंकू समारंभासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेना उपनेते सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण व दीपक निकम (शिवसेना विधानसभा संघटक) यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर चैतन्य महाराज बुरुडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर व विचारांवर सुमारे एक तास प्रभावी व्याख्यान दिले. या व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास विविध महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.
तसेच शिवसेना सुकापूरचे विभाग प्रमुख धनंजय पाटील, विशाल भोईर, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, शाखा प्रमुख हनुमंत खंडागळे, महिला आघाडी भारती गोसावी तसेच शिवसेना प्रणीत डॉ. सेल महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष बांदेकर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.



